मुंबई : मुंबईतील आगीचं सत्र अजूनही सुरूच आहे. मुंबईत आठवडाभरात आगीची दुसरी घडना घडली आहे. 


रात्री २ वाजता आग


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईच्या अंधेरी विभागात असलेल्या मरोळ मध्ये मैमून इमारतीत तिसऱ्या मजल्याला भीषण आग लागली असून यात चार जणांचा मृत्यू झाला आहे. हे चार ही जण कपासी या एकाच कुटुंबातील आहेत. रात्री २ वाजताच्या दरम्यान या इमारतीत राहणाऱ्या कपासी कुटुंबाच्या रूम नंबर ६०३ ला भीषण आग लागली. 


मदतीसाठी हाक...पण...


हे कुटुंब खिडकी मधून लोकांकडे मदत मागत होते. परंतु त्यांना कोणाला ही मदत करणे शक्य झाले नाही. अग्निशमन दलाने दिलेल्या माहिती नुसार ही आग दीड ते दोन वाजताच्या दरम्यान लागली होती. आग लागली त्या घरात एकूण चार जण होते तर त्याच्या वरच्या माळ्यावर ७ जण होते. या सर्व जखमींना कूपर आणि जवळच्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. पोलीस आणि अग्निशमन दल आग कश्या मुळे लागली याचा शोध घेत आहेत.