नवी मुंबई : नवी मुंबईमधल्या पाम बीच मार्गावरच्या २१ मजली टॉवरला आग लागली आहे. सीवूडमधल्या 'सी होम्स' टॉवरच्या २० व्या मजल्यावर सुरुवातीला आग लागली. त्यानंतर आग वाढत २१ मजल्यावर पसरली. पहाटे साडेसहाच्या सुमाराला आग लागली. आग लागताच सर्व रहिवाशांना सुखरूप खाली उतरवण्यात आलं. दोन तासांच्या प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पण कुलिंगचं काम सुरु असतानाच सिलेंडरचा स्फोट झाला. त्यात अग्नीशमन दलाचे सात जवान जखमी झाले. त्यांना पालिकेच्या रुग्णालयात दाखल केलंय. टॉवरचे तीन मजले या आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले. शॉर्ट सर्किटनं आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येतोय. 



त्याचप्रमाणे, त्याचप्रमाणे, मुंबईतल्या काळाचौकी परिसरातील अभ्युदय नगरच्या मिलान इंडस्ट्रीयल इस्टेट इथं मध्य रात्रीच्या सुमारास भीषण आग लागली होती. आगीची माहिती मिळताच अग्नीशमन दालाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. 



अथक परिश्रमानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात आग्निशमन दलाला यश आलंय. यात कोणतीही जीवितीहानी झाली नसून, शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची माहिती समोर आली.