मुंबई : कुर्ला एलबीएस रोड येथील कल्पना सिनेमाजवळ एका गोडाऊनला आग लागली होती. अग्निशमन दलाच्या पाच गाड्या आणि पाच वॉटर टँकरनी ही आग आटोक्यात आणली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या आगीमुळे परिसरात धुराचे साम्राज्य पसरले होते. सकाळी ९ च्या सुमारास ही घटना घडली. नासिबूलला कंपाऊंड इथल्या कागदाच्या गोडाऊनला आग लागली होती. तळ मजल्यावरील गोडाऊननं पेट घेतल्यानंतर प्रसंगावधान राखत पहिल्या मजल्यावर राहत असलेलं कुटुंब खाली उतरले... आणि आपला जीव वाचवला.


आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. ही आग विझवताना अग्निशमन दलाचा एक जवान जखमी झालाय. 


सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झाली नसून या ठिकाणी कपड्यांची अनेक गोदामं आहेत. त्यामुळे आग पसरण्याचा धोका होता. मात्र अग्निशमन दलामुळे आग आटोक्यात आली. 
 
या भागात अनेक अनधिकृत गोडाऊन असून त्यांच्याकडे अग्नीसुरक्षा यंत्रणाच नाहीत, असंही आता समोर येतंय.