अग्निसुरक्षा सेलच्या कामकाजाला आजपासून सुरूवात
आठवडाभरापूर्वी लोअर परेल येथील कमला मील कम्पाऊंडमध्ये लागलेल्या आगीत 14 नागरिकांचा होरपळून मृत्यू झाला. या दुर्घटनेमध्ये निष्पाप नागरिकांचा जीव गेल्यानंतर रेस्टॉरंट आणि पब मधील त्रुटींबाबत प्रशासन जागे झाले आहे.
मुंबई : आठवडाभरापूर्वी लोअर परेल येथील कमला मील कम्पाऊंडमध्ये लागलेल्या आगीत 14 नागरिकांचा होरपळून मृत्यू झाला. या दुर्घटनेमध्ये निष्पाप नागरिकांचा जीव गेल्यानंतर रेस्टॉरंट आणि पब मधील त्रुटींबाबत प्रशासन जागे झाले आहे.
पालिकेची कडक कारवाई
दरम्यान कमला मिल कंपाऊंडमधील मोजो आणि वन अबव्ह या रेस्टोपब्सना लागलेल्या भीषण आगीनंतर अखेर मुंबई महापालिका आयुक्तांनी कडक पावलं उचलली आहेत. यानुसार मुंबईत अग्निसुरक्षा सेलच्या कामकाजाला आजपासून सुरूवात होणार आहे.
काय असेल कारवाई ?
हॉटेल, रेस्टॉरंट आस्थापनांमध्ये अग्निप्रतिबंधक यंत्रणा नसल्यास थेट कारवाई केली जाणार आहे. यामध्ये कुठलीही नोटीस न देता त्यांना सील ठोकलं जाईल.