मुंबई : थकीत कर्जमाफी निकष निर्धारण समितीची पहिली बैठक आज संध्याकाळी 4 वाजता मुंबईतल्या सह्याद्री अतिथीगृहात होणार आहे.  या समितीमध्ये चंद्रकात पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उच्चाधिकार समिती आणि शेतकरी संघटना सुकाणू समितीचे सभासद उपस्थित राहतील.  दोन्ही गटांमध्ये कर्जमाफीबद्दलच्या चर्चेची पहिली फेरी पार पाडणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ही पहिलीच बैठक वादळी ठरण्याची शक्यता आहे.  कर्जमाफी होईपर्यंत शेतकऱ्यांना पेरणीच्या कामासाठी दहा हजार रुपये देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला होता. मात्र यामध्ये अनेक अटी-नियम लादले होते. यामुळे गरजू शेतकरी यांना खरंच मदत मिळेल का याबाबत शंका उपस्थित केली जात आहे.


त्यातच याअटी या कर्जमाफीसाठी सुद्धा असतील अशीही चर्चा जोर धरू लागली आहे. त्यामुळे कर्जमाफीच्या पहिल्या बैठकीत निर्णय कमी आणि वाद जास्त होण्याची शक्यता आहे.