मुंबई : मुंबई आणि गोवा अशी क्रूझ सर्विसची आतुरतेने वाट पाहणाऱ्या प्रवाशांची प्रतिक्षा आतुरता आता संपली आहे. शनिवारी भारतातील या पहिल्या क्रूझ सर्विसचा शुभारंभ झाला. अंग्रिया असं या क्रूझचं नाव आहे. या क्रूझमद्ये शनिवारी एक खास गोष्ट घडली. अंग्रियाचे कॅप्टन इरविन सिक्वेराने शनिवारी एका जोडीचा विवाह सोहळा अंग्रिया या क्रूझवर संपन्न झाला. क्रूझवर लग्न करण्याअगोदर या जोडीने शनिवारी कोर्ट मॅरेज केलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अंग्रिया क्रूझवर लग्न सोहळा संपन्न झाल्यावर या वधुने सांगितलं की, हा माझ्या आयुष्यातील सर्वात अद्भुत क्षण आहे. कारण मी माझ्या लग्नाचा असा विचार केलाच नव्हता. तिने सांगितलं की, क्रूझवर लग्न करण्यासाठी ती स्वतःला खूप भाग्यशाली समजते. यावर कॅप्टन इरविन सिक्वेरा यांनी सांगितलं की, 15 वर्षांच्या करिअरमध्ये 60 हून अधिक जहाज चालवलेल्या कॅप्टन सिक्वेरा यांना लग्न करून देण्याचा संपूर्ण अधिकार आहे. 



अंग्रिया क्रूझ सर्विसच्या शुभारंभाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील क्रूझ टर्मिनलचे उद्घाटन केले. इथे नितीन गडकरी यांनी सांगितलं की, पुढच्या पाच वर्षांत लाख तरूणांना रोजगार मिळेल. मुंबई - गोवा क्रूझ सेवा, भारताची सर्वात पहिली लक्झरी क्रूझ लायनर आहे.