चमचमीत वडापाव महागला, मुंबईकरांच्या खिशाला भार
आख्ख्या मुंबईसह महाराष्ट्राचा जीव की प्राण असलेला वडापाव (Vada Pav) महागला आहे.
मुंबई : आख्ख्या मुंबईसह महाराष्ट्राचा जीव की प्राण असलेला वडापाव (Vada Pav) महागला आहे. (Working Class Food) वडापाव हा सामान्यांचा 'बर्गर' म्हणून ओळखला जातो. मुंबईकरांनो वडापाव महागला आहे. चमचमीत वडापाव 3 ते 5 रुपयांनी महागला आहे. डाळ, तेल हिरवा मसाला महागल्याने दरवाढ करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईकरांच्या खिशाला भार पडणार आहे.
डाळ, तेल, हिरवा मसाला यांच्या किंमतीत वाढ झाली आहे. या महागाईचा परिणाम हा वडापावच्या दरात वाढ करण्यात आली आहे. आता वडापावच्या किंमतीत 3 ते 5 रुपयांची वाढ झाली आहे. उपनगरांत 15 रुपयांचा वडावाप 18 ते 20 रुपयांवर गेला आहे. तर 20 रुपयांचा वडापाव 22 ते 24 रुपये झाला आहे. डाळ, तेल, हिरवा मसाल्याच्या किंमतीत वाढ झाल्याने वडापाव महागला आहे. तसेच वडापाव सोबत भजीप्लेटच्या दरातही वाढ झाली आहे.
सध्या महागाईचा कहर दिसून येत आहे. तेल, डाळी यांच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. तसेच गॅस सिलिंडरही महागला आहे. तर दुसरीकडे पेट्रोल-डिझेल यांच्या किंमती सातत्याने वाढत आहेत. याचा सगळा परिमाण हा महागाईवर होत आहे. वाहतूक खर्चात वाढ होत असल्याने परिणामी महागाईची छळ ही सर्वसामान्यांना बसत आहे.