भाजपची खेळी? आठवलेंकडून दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदार संघाची चाचपणी
आठ्वलेंच्या घोषणेआडून भाजपची शिवसेनेवर दबाव आणण्याची खेळी खेळली जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
मुंबई: केंद्रीय राज्य मंत्री आणि रिपाईंचे अध्यक्ष रामदास आठवले यांना पुन्हा एकदा लोकसभेचे वेध लागले आहेत. त्यामुळे त्यांनी दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघावर आपले लक्ष केंद्रीत केले असून, त्यादृष्टीने पावले टाकण्यास सुरूवात केल्याचे चित्र आहे. याच पार्श्वभूमीवर आठवले यांनी आज सायंकाळी महत्वाची बैठक बोलावली आहे. मात्र, आठवलेंच्या आढून भाजप शिवसेनेवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळातून सुरू झाली आहे.
शिवसेना आणि भाजप यांच्यात संघर्ष
शिवसेना भाजपसोबत सत्तेत सहभागी तर आहे. पण, सत्तेत सगहभागी झाल्याचा पहिल्या दिवसापासून शिवसेना आणि भाजप यांच्यात संघर्ष सुरू आहे. हा संघर्ष सत्तेचा तर आहेच पण वर्चस्वाचाही आहे. त्यातच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना यापूढे स्वबळावर निवडणूक लढेल अशी घोषणा केली आहे. त्यामुळे भाजपची कोंडी झाली आहे. त्यामुळे आगामी निवडणुका शिवसेनेने स्वबळावर लढाव्यात असे भाजपला वाटते. त्यासाठी भाजपचे नेतेही तशी वक्तव्य करत असतात. पण, अद्याप तरी शिवसेनेने आपली भूमिका बदलली नाही. या पार्श्वभूमिवर आठवलेंच्या बैठकीला महत्त्व आले आहे.
भाजपची शिवसेनेवर दबाव आणण्याची खेळी ?
गेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप युती होती. त्यामुळे हा दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला गेला. त्यात शिवसेना निवडणूनही आली. विद्यमान खासदार राहुल शेवाळे हे या मतदारसंघातून शिवसेनेचे प्रतिनिधित्व करत आहेत. दरम्यान, शिवसेनेने सोबत यावे यासाठी भाजप प्रयत्नशिल आहे. पण शिवसेना ठाम आहे. त्यामुळे आठ्वलेंच्या घोषणेआडून भाजपची शिवसेनेवर दबाव आणण्याची खेळी खेळली जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.