मुंबई : महाराष्ट्राचे माजी एटीएस प्रमुख हिमांशू रॉय यांनी शुक्रवारी 11 मे रोजी आत्महत्या केल्याचं समजताच अनेकांना आश्चर्याचा धक्का बसलाय... त्याचं कारण म्हणजे हिमांशू रॉय यांचं व्यक्तीमत्व आणि त्यांचा गुन्हेगारांवर असलेला दबदबा... हिमांशू रॉय यांनी सरकारी निवासस्थानी आपल्या तोंडात गोळी झाडून घेतली. गोळीचा आवाज झाल्यानं तातडीनं उपस्थित असलेल्या लोकांनी धाव घेत हिमांशू रॉय यांना जवळच्या बॉम्बे हॉस्पीटलमध्ये दाखल केलं. परंतु, हॉस्पीटलमध्ये पोहचण्यापूर्वीच हिमांशू रॉय यांचा मृत्यू झाला होता. हिमांशू रॉय यांचा अनेक हाय प्रोफाईल्स उलगडण्यात मोठा हात होता.


त्यांच्याबद्दल काही खास गोष्टी जाणून घेऊयात... 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

- हिमांशू रॉय हे 1988 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी होते. त्यांनी मुंबईच्या प्रसिद्ध सेन्ट झेवियर्स महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केलं होतं 


- हिमांशू रॉय यांनी मुंबई एटीएस चीफ पदाचाही कारभार हाताळला. त्यांना महाराष्ट्र पोलीस दलातील कठोर आणि कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळखलं जात होतं 


- पोलीस दलात ते 'एन्काऊंटर स्पेशालिस्ट' म्हणून ओळखले जात होते. 


अधिक वाचा - हिमांशू रॉय यांनी का केली आत्महत्या, हे आहे कारण?


- 2013 मध्ये इंडियन प्रीमिअर लीग मॅचदरम्यान स्पॉट फिक्सिंग प्रकरणात त्यांनी बिग बॉस फेम विंदू दारा सिंह याला अटक केली होती, तेव्हा त्यांचं नाव चर्चेत आलं होतं 


- दाऊदची भारतातली आत्तापर्यंत जितकी संपत्ती जप्त झाली त्यामागे हिमांशू रॉय यांचा हात होता, असं म्हटलं जातं


- अंडरवर्ल्डच्या बातम्या देणारे पत्रकार जे डे यांच्या हत्या प्रकरणाचा गुंता सोडवण्यात त्यांचा महत्त्वाचा सहभाग होता


अधिक वाचा - हायप्रोफाईल केसेस धसास लावणारे हिमांशू रॉय यांची आत्महत्या


- प्रशासनाकडून झेड + श्रेणी सुरक्षा देण्यात आलेले हिमांशू रॉय हो मुंबई पोलीस दलातील पहिले अधिकारी होते


- विजय पालंदे आणि लैला खान दुहेरी हत्याकांड तसंच पल्लवी पुरकायस्त हत्याकांडाची चौकशीही हिमांशू रॉय यांच्याकडेच होती