मुंबई :  Anil Deshmukh : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा ताबा सीबीआयने घेतला आहे. आर्थर रोड जेलमधून सीबीआय अधिकाऱ्यांनी देशमुख यांना ताब्यात घेतले आहे. देशमुख यांना CBI न्यायालयात रिमांडसाठी आणण्यात येणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सीबीआयने 100 कोटी रुपये वसुली आरोप प्रकरणात चौकशीसाठी देशमुख यांना ताब्यात घेतले आहे. अनिल देशमुख यांचा सोमवारी सीबीआय ताब्यात येणार होती, मात्र देशमुख जे जे रुग्णालयात भरती असल्याने तीन दिवस त्यांचा ताबा लांबणीवर पडला होता. अनिल देशमुख हे ईडीच्या न्यायालयीन कोठडीत आहेत. ईडीकडून त्यांची चौकशी करण्यात येत आहे.


अनिल देशमुख यांना आर्थर रोड जेलमधून सीबीआयचे BKC येथील कार्यालयात नेण्यात येईल. त्यानंतर त्यांना अटक करण्यात येईल. अटक केल्यानंतर अनिल देशमुख यांना मुंबई सत्र न्यायालयातील सीबीआय कोर्टात हजर करण्यात येणार आहे. सीबीआय अनिल देशमुख यांची सीबीआय कोठडी मागण्याची शक्यता आहे.


या प्रकरणात यापूर्वी सीबीआयने सचिन वाझे, कुंदन शिंदे, संजीव पालांडे यांना अटक करत 11 एप्रिलपर्यंत सीबीआयच्या कोठडीत न्यायालयाने रवानगी केली आहे. आज दुपारी 2.30 वाजता मुंबई सत्र न्यायालयात अनिल देशमुख यांना हजर केले जाणार आहे.