माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना पुन्हा ईडीने बजावले समन्स
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अंमलबजावणी संचलनालयाने अर्थात ईडीने चौकशीसाठी पुन्हा समन्स पाठवले आहेत. (Former Home Minister Anil Deshmukh summoned again by ED)
मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अंमलबजावणी संचलनालयाने अर्थात ईडीने चौकशीसाठी पुन्हा समन्स पाठवले आहेत. (Former Home Minister Anil Deshmukh summoned again by ED) देशमुख यांना आज ईडीच्या कार्यालयात हजर राहायचे आहे. परंतु ते उपस्थित राहतील की नाही, याबाबत शंका आहे. त्यांच्यावतीने पुन्हा वेळ मागून घेण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
दरम्यान, शनिवारी अनिल देशमुख ईडीच्या कार्यालयात हजर राहिले नव्हते. त्यांच्या वकीलांनी म्हटले की, चौकशीसाठी लागणारे कागदपत्र उपलब्ध होण्यासाठी काही अवधी हवा आहे. त्यामुळे नवी तारिख मिळावी यासाठी देशमुख यांच्या वकिलांनी ईडीला कळवले होते. त्यानंतर शनिवारी ते उपस्थित राहले नव्हते. आजही ते आणखी अवधी देण्याची मागणी करु शकतात, अशी शक्यता आहे.
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीनं दुसरे समन्स बजावले आहे. चौकशीसाठी त्यांना आज सकाळी 11 वाजता ईडीच्या कार्यालयात हजर राहाण्याचे आदेश देण्यात आलेत. मात्र ते आज ईडीसमोर हजर राहण्याची शक्यता कमी आहे. गेल्या आठवड्यात ईडीने त्यांना समन्स जारी करून चौकशीसाठी बोलावले होते. मात्र देशमुख यांनी वकिलाला पाठवून मुदत मागून घेतली होती. आजही ते वकिलांमार्फत अर्ज पाठवण्याची शक्यताय. अनिल देशमुख ज्ञानेश्वरी बंगल्यावरच आहेत. त्यांच्या वकिलांची टीम ज्ञानेश्वरी बंगल्यावर दाखल झाली आहे.
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर मुंबईचे पोलीस आय़ुक्त परमबीर सिंह यांनी 100 कोटीच्या खंडणी वसुलीचे आरोप लावले होते. त्याप्रकरणी ईडीने देशमुख यांचे स्वीय सचिव संजिव पालांडे आणि कुंदन शिंदे यांना अटक केली आहे. दरम्यान, ED ने देशमुख यांना पुन्हा नोटीस पाठवून आता मंगळवारी कार्यालयात उपस्थित राहण्यास सांगितले आहे.