मुंबई : शिवसेना माजी नगरसेवक अशोक सावंत हत्या प्रकरणात चौथ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. विशाल गायकवाड या ३३ वर्षाच्या युवकाला कल्याणमधून अटक करण्यात आली आहे.


मारेकऱ्यांना आश्रय दिल्याचा आरोप


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विशाल गायकवाड याला आज दुपारी ४ वाजता अटक करण्यात आली. विशाल गायकवाडवर मारेकऱ्यांना आश्रय दिल्याचा आरोप आहे. या प्रकरणातला फरार असलेल्या मुख्य सूत्रधाराचा गायकवाड हा नातेवाईक असल्याचं सांगण्यात येतं आहे.


गाडीही मुंबई पोलिसांनी घेतली ताब्यात


विशाल गायकवाडची वॅगन आर ही गाडीही मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. अशोक सावंत यांच्यावर हल्ला केल्यानंतर, आरोपी गायकवाडच्या कल्याण येथील घरी गेले. आरोपींनी कपडे बदलले, दारू आणि जेवण झालं. त्यानंतर गायकवाडने फरार आरोपीला एसटी स्टँडवर सोडले.


यापूर्वी ३ जणांना अटक


रिक्षा चालक गणेश जोगदंड, कॉन्ट्रॅक्ट किलर सोहेल दोडीया आणि एका अल्पवयीन मुलगा अशा तिघांना या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. तिघांची न्यायालयानं पोलीस कोठडीत रवानगी केली आहे.