मुंबई : दक्षिण मुंबईच्या लोहार चाळीत चार मजली इमारत कोसळली आहे. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अनेक जण अडकल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. अहमद नावाची ही इमारत कोसळली असून अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. मदतकार्य सुरु करण्यात आले आहे.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

क्रॉफर्ड मार्केट परिसरातील  लोकमान्य टिळक रोड येथील चार मजली इमारतीचा एक भाग कोसळला. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली काही जण अडकल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, रुग्णवाहिका आणि बचाव पथके वाहनांसह पोहोचली आहेत. तर ७ मुंबई अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.


दरम्यान, बृहन्मुंबई महानगरपालिकेने (बीएमसी) ही इमारत आधीच रिकामी केली होती. त्यामुळे या इमरातीमध्ये कोणीही अडकले नाही, अशी माहिती देण्यात आली आहे.