ऑनलाईन शॉपींगमध्ये मागवला मोबाईल मिळाली साबणाची वडी
मोबाईल आला खरा पण जेव्हा बॉक्स उघडला तेव्हा मात्र सिराजयांच्या आनंदावर विरजण पडलं.
मुंबई: ऑनलाईन शॉपिंग करताना फसवणुकीचे प्रकार वाढत चाललेत. याचाच प्रत्यय दादरच्या सिरीज खान यांना आला. दहावीत असलेल्या सिराज यांच्या मुलीला ८५ टक्के मिळाले. मुलीला बक्षीस म्हणून सिराज यांनी तिला १६ हजार ६७५ रूपयांचा शाओमी नोट ५ प्रो ऑर्डर केला आणि ऑनलाईन पेमेंट देखील केली. बुधवारी ठरल्याप्रमाणे मोबाईल आला खरा पण जेव्हा बॉक्स उघडला तेव्हा मात्र सिराजयांच्या आनंदावर विरजण पडलं.
बॉक्समध्ये मोबालची वडी
बॉक्स मध्ये मोबईलच्या जागी होती चक्क साबणाची वडी. मोबईल आणणाऱ्या मुलासा विचारले असता त्याला देखील यासंबधी काही माहिती नव्हती. याप्रकरणी सिराज यांनी ऑनलाईन कंपनी कडे तक्रार केली आहे.
ऑनलाईन शॉपींगच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह
दरम्यान, बॉक्समध्ये मोबाईलची वडी, दगडाचे, विटांचे तुकडे यायचे प्रकार आता नवे राहिले नाहीत. अनेकदा असे प्रकार घडत आहेत. या प्रकारांमुळे ऑनलाईन शॉपींगवरचा ग्राहकांच्या विश्वासाला तडा जाण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. म्हणूनच ऑनलाईन शॉपींगमधील फसवेगिरीला आळा घालण्यासाठी कठोर उपाययोजना आमलात आणण्याची मागणी वाढू लागली आहे.