मुंबई : अॅप बेस टॅक्सी सर्व्हिस उबरनं भाडेवाढ जाहीर केलीये. वाढत्या इंधन दरांमुळे मुंबईतील भाडं 15 टक्क्यांनी सरसकट वाढवण्यात आल्याचं उबर इंडिया अँड साऊथ एशियाचे वरिष्ठ अधिकारी नितीन भूषण यांनी सांगितलं. 22 मार्चपासून पेट्रोल-डिझेल 6 रुपये 40 पैशांनी महागले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आर्थिक नुकसान होत असल्याची तक्रार अनेक चालक करत आहेत. त्यामुळे दरवाढ करण्यात आली असून येत्या काळात इंधनाच्या दरांवर नजर ठेवण्यात येईल आणि त्यानुसार भाड्याबाबत निर्णय घेतला जाईल, असं कंपनीनं जाहीर केलंय. 


पेट्रोल-डिझेलचे दर दररोज काही पैशांनी वाढत आहेत. येत्या काही दिवसात ही वाढ 15 रुपयांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. पण याचा परिणाम आतापासून होण्यास सुरुवात झाली असून याचा परिणाम थेट सर्वसामान्यांच्या खिशावर होणार आहे. इंधनाच्या दरात होत असलेली वाढ. (Fuel Price Hike) पाहता उबरने (Uber Taxi) भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला.