मुंबई : मुंबई विमानतळ परिसरातील फनेल झोनमधील इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न अखेर मार्गी लागलाय. विलेपार्ले, सांताक्रूझ, वाकोला, कुर्ला आणि घाटकोपर भागातील लाखो रहिवाशांना त्यामुळे दिलासा मिळालाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उंचीच्या निर्बंधामुळं या इमारतींचं पुनर्वसन रखडलं होतं. झी 24 तासनं या प्रश्नाला वाचा फोडल्यानंतर मुंबई महापालिकेनं त्याची दखल घेतलीय. त्यानुसार मुंबईच्या प्रारूप विकास आराखडा 2034 मध्ये अनेक सुधारणा करण्यात आल्या असून, त्या राज्य सरकारच्या नगरविकास खात्याकडं अंतिम मंजुरीसाठी पाठवल्या आहेत.