Future Group Owner  Kishore Biyani Deal: बिग बाझार या प्रसिद्ध रिटेल स्टोअरची मालकी असलेल्या  फ्युचर ग्रूपचे संस्थापक आणि नामवंत उद्योजक किशोर बियानी यांनी एक मोठा व्यवहार मार्गी लावला आहे. बन्सी मॉल मॅनेजमेंट कंपनीला किशोर बियानी 571 कोटी रुपये देणं लागत होते. त्यांनी एकाच वेळी एका सौद्याच्या माध्यमातून 476 कोटी रुपयांचं पेमेंट करत हा व्यवहार निकाली काढला आहे. म्हणजेच जेवढी रक्कम देणं बाकी होतं त्यापेक्षा 95 कोटी कमी रक्कमेमध्ये हा व्यवहार बियानी यांनी पूर्ण केला.


बोली लागली पण...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

के. रहेजा कॉर्परेशनच्या माध्यमातून हा व्यवहार झाल्याची माहिती 'द इकनॉमिक्स टाइम्स'ने दिली आहे. दक्षिण मुंबईमध्ये पूर्वी क्रॉसरोड्स नावाने ओळखल्या जाणाऱ्या सोबो सेंट्रल मॉलच बियानी यांनी रहेजा कंपनीला विकला आहे. सोबो सेंट्रल मॉलला ऐतिहासिक महत्त्व आहे. सोबो सेंट्रल मॉल हा देशातील पहिला मॉल आहे. 1990 च्या उत्तरार्धामध्ये हा मॉल सुरु झाला होता. या व्यवहाराच्या माध्यमातून बँकाने यशस्वीपणे रिकव्हरी केली आहे. एकीकडे शेकडो कोटींची कर्ज बँकांना बुडीत कर्ज म्हणून दाखवावी लागत असतानाच हा व्यवहार यशस्वीपणे पार पडल्याने या व्यवहाराची सध्या सगळीकडे चर्चा आहे. कॅनरा बँकेच्या माध्यमातून कर्ज देणाऱ्याने हा लिलाव केला. या लिलावामध्ये 475 कोटींची बोली लावण्यात आली. मात्र त्यानंतर बियानी यांनी संपूर्ण व्यवहार 476 कोटींना मिटवून टाकण्याची काऊंटर ऑफर दिली. ही ऑफर कर्जदाराने मान्य केली. 


28 कोटी 56 लाखांची स्टॅम्प ड्युटी


के. रहेजा कॉर्परेशनची उप कंपनी असलेल्या के. रहेजा कॉर्परेशन रिअल इस्टेटने सोबो सेंट्रोल मॉलचा ताबा मिळवला आहे. यामध्ये लिजवर देता येईल अशी 1 लाख 50 हजार स्वेअऱफुटांची जागा आहे. या मॉलसंदर्भातील व्यवहार मंगळवारी पूर्ण झाला. यासाठी 28 कोटी 56 लाखांची स्टॅम्प ड्युटी भरण्यात आली. थेट बँकांना पैसे देऊन हा व्यवहार मार्गी लावण्यात आल्याच्या वृत्ताला बियानी यांनी दुजोरा दिल्याचं 'द इकनॉमिक्स टाइम्स'च्या वृत्तात म्हटलं आहे. आता या मॉलची मालकी के. रहेजा कॉर्परेशनकडे असणार आहे.


मॉलला आर्थिक घरघर


सोबो सेंट्रल मॉलमध्ये सध्या काही भाडेकरुंबरोबरच मॅक्डॉनल्ड्सचं 1999 साली सुरु झालेलं आऊटलेट आहे. मात्र या आऊटलेटमध्ये मागील काही काळापासून ग्राहकांची संख्या झपाट्याने कमी होत गेली आहे. आजाबाजूच्या परिसराचा झपाट्याने विकास झाल्याने या मॉलमध्ये येणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे. सोबो सेंट्रल मॉलला आर्थिक घरघर कोरोनाच्या कालावधीमध्ये लागली. भाडेतत्वाच्या माध्यमातून होणारी कमाई बंद झाली. तसेच या मॉलमधील अनेक गाळे हे फ्युचर ग्रुप कंपनीमधील उपकंपन्यांनाच देण्यात आल्याने त्यामध्यमातूनही कमाई मंदावली.