मुंबई : मुंब्रा, पनवेल आणि ठाणे बेलापूर रस्त्यावर जेएनपीटीकडे जाणाऱ्या कंटेनर्सनी नेहमीच वाहतूक कोंडी होते. मात्र केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांनी यावर उतारा शोधून काढला आहे. 


वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वसई इथेच धक्का उभारून त्यावरून सर्व कंटेनर्स समुद्रमार्गे जेएनपीटीकडे नेण्याची योजना त्यांनी आखली आहे. यामुळे मोठा फायदा होणार आहे. यामध्ये वेळ देखील वाचणार आहे आणि दळणवळणाचा खर्च देखील कमी होण्याची शक्यता आहे.