दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : गेनबिटकॉईन डॉट कॉम या संकेतस्थळाच्या आधारे पोंझी स्कीम सुरू करून हजारो कोटी रुपयांची फसवणूक प्रकरणाची ईडीमार्फत चौकशी केली जाईल, असं आश्वासन गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी आज विधानसभेत दिलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमित भारद्वाज व त्याच्या प्रतिनिधींनी गेनबिटकॉईन डॉट कॉम या संकेतस्थळाद्वारे पोंझी स्कीम चालवून मुंबई, पुणे, नांदेड, कोल्हापूरसह राज्यातील हजारो गुंतवणुकदारांची २ हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेची फसवणूक केली आहे. याप्रकरणातील मुख्य आरोपी अमित भारद्वाज परदेशात फरार झाला असून त्याच्याविरोधात लूक आऊट नोटीस काढण्यात आली आहे. 


तर अमोलकुमार थोंबाळे, बालाजी पांचाळ, राजू मोतेवार यांचाही यात समावेश असून हे सगळे जण फरार आहेत. याप्रकणात पोलीसांनी आरोपींची बँक खाती सील केली असून त्यातून ६ कोटी रुपये जप्त केले आहेत.