मुंबई : सगळीकडे आता गणपती बाप्पाच्या आगमनाची ओढ साऱ्यांना आहे. सगळीकडचं वातावरण अगदी मनमोहक आणि भक्तीमय आहे. अशा प्रसन्न वातावरणात बाप्पाचं गाणं लाँच झालं आहे जे तुम्हाला मंत्रमुग्ध करेल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'मोरया मोरया' हे गाणं संगीतकार - गीतकार ध्रुव दातारने शब्दबद्ध केलं आहे. ध्रुव दातारचा हा पहिलाच प्रयत्न असून हे संगीतपुष्प त्याने बाप्पाच्या चरणी अर्पण केलं आहे. प्रसिद्ध संगीत संयोजक तुषार देवल याने म्युझिक अरेंजरची भूमिका पार पाडली आहे. मनोज टेंबे याच्या आवाजात हे गाणं रेकॉर्ड करण्यात आलंय. आपल्याला माहितच आहे, श्रावण महिन्यात अनेक सणांची रेलचेल असते. पण गणरायाचं आगमन हे या दिवसातील खास आकर्षण असतं. या दिवसांत भक्तीमय वातावरण असतं या वातावरणात बाप्पाच्या जवळ नेणारं हे गाणं नक्कीच आपल्याला भावेल. 



अनेक गाणी बाप्पाच्या या उत्सवात अर्पण केली जातात. प्रत्येकाचा हा भक्ती भाव नक्कीच कौतुकास्पद असतो. आपापल्या प्रतीने या बाप्पाच्या चरणी नतमस्तक होण्याची संधी असते. 'मोरया मोरया' हे गाणं अगदी तशाच प्रकारचं आहे. जे तुम्हाला बाप्पाच्या आणखी जवळ घेवून जाईल.