मुंबई : रंगीबेरंगी फुलांची आकर्षक सजावट, सुगंधी - धुप अगरबत्यांचा दरवळ, मंगलमयी वाद्यांची सुरावट आणि लक्ष वेधून घेणारी आरास अशा प्रसन्नशील चैतन्यदायी वातावरणात आज घरोघरी लाडक्या गणरायाचे आगमन होतंय. प्राणप्रतिष्ठापनेसाठी दुपारी दीडपर्यंत उत्तम मुहूर्त असल्याचं सांगण्यात येतंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महागाई, इंधन दरवाढ हे सारं विसरून प्रत्येकाला बाप्पांच्या प्राणप्रतिष्ठेचे वेध लागलेत. गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात अनेक गणेशभक्तांनी बुधवारी बाप्पांना आपल्या घरी नेले, तर काही गणेशभक्त, आज, गुरुवारी बाप्पांचे घरी स्वागत करतील.


शहरातील प्रमुख मंडळाची तयारीही पूर्ण झालीय. मुंबईसह राज्यभरात आता दहा दिवस फक्त आणि फक्त गणरायाचे दिवस असणार आहेत.