मुंबई: यंदा गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी एसटी प्रशासनाने विशेष सोय केली आहे.  मुंबईतील चाकरमान्यांना त्यांच्या कोकणातील गावी सुखरूप सोडण्यासाठी एसटीने 2225 बसेसची सोय केली आहे.  येत्या ९ ऑगस्टपासून संगणकीय आरक्षणासाठी या जादा बसेस लावण्यात आल्या आहेत. 


तसेच ग्रुप बुकिंगला १ ऑगस्टपासून सुरवात करण्यात येणार आहे. सुखरुप प्रवासाच्या दृष्टीने या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी केला आहे.