मुंबई : गेले १२ दिवस मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात गणेशोत्सवाचा जल्लोष बघायला मिळतो. पण आता अनंत चतुर्दशीला बाप्पाच्या विसर्जनाची वेळ जवळ आली आहे. अगदी जड अंतकरणाने भाविक आपल्या या लाडक्या गणरायाला निरोप देऊन पुढच्या वर्षी लवकर या अशी विनवणी करत असतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

२५ ऑगस्ट रोजी बाप्पाची वाजत गाजत स्थापना केली. आणि उद्या म्हणजे अनंत चतुर्दशीला बाप्पाला निरोप दिला जाणार आहे. गेल्या १२ दिवस प्रत्येक भाविक मग तो घरगुती बाप्पा असो वा मंडळातील त्याची मनोभावे पूजा करतो. आता हा आपला लाडका बाप्पा मनाला हुरहूर लावून जाणार; ते पुढच्या वर्षी येण्याचं आश्वासन देऊनच. उद्या आपल्या बाप्पाचा आपल्या घरातला शेवटचा दिवस अर्थात अनंतचतुर्दशी. आदल्या दिवशी पासूनच घरोघरी बाप्पाला निरोप देण्यासाठी तयारी सुरु झालीये.


यंदा गणपती वाजत गाजत आले पण DJ च्या आवाजात नाही तर; ढोल ताशांच्या गजरात. अगदी पारंपारिक पद्धतीने. त्यांच्या विसर्जनाच्या मिरवणुकीची तयारी आज पासूनच सुरु झालेली दिसतेय. बाजारात एक नजर फिरवली असता सगळीकडे असेच चित्र दिसून येतंय. फुल, भाजी, या सोबतच ढोल ताशा यांचेही दर आसमनाला भिडलेले आहेत. त्यातही आपल्या मंडळाला चांगले वादक मिळावे म्हणून धावपळ सुद्धा पाहायला मिळत आहे. या तयारी सोबतच विसर्जन मुहूर्त सुद्धा बघावे लागते. पण यासोबत आपण


बाप्पाला निरोप देताना काय महत्वाच्या गोष्टी केल्या पाहिजेत हे सुद्धा जाणून घेऊया. 


घरचे गणपती असो किंवा मंडळाचे काही छोट्या टीप्स वापरून पर्यावरणाचा समतोल राखत आपण गणेशाला निरोप देऊ शकतो. त्यामुळे पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचा मानस पूर्ण होण्यास आपला सुद्धा हाथभार लागेल. 


घरगुती छोट्या गणेश मुर्तीचे विसर्जन शक्यतो कृत्रिम तलावातच करावे..


निर्माल्य संकलन करणाऱ्या कार्यकर्त्यांजवळ सोपवावे किंवा निर्माल्य कलशात टाकावे…


घरीच पिट बनवून त्यात निर्माल्य टाकल्यास घरीच खत तयार करता येईल…


मंडळाच्या मोठ्या मूर्ती विसर्जित न करता केवळ छोट्या मुर्तींचे विसर्जन करून सुद्धा पर्यावरणाचा समतोल साधण्यास मदत करता येईल.


विसर्जन मिरवणुकीत आवाजाची मर्यादा ओलांडल्या जाणार नाही याची काळजी सर्वांनी घेणे गरजेचे आहे.


गणेश विसर्जनाचा मुहूर्त 


गणेश विसर्जन मुहूर्त : सकाळ ९:२०-१:५८ 


दुपारी  ३:३१-५:०४


संध्याकाळ ८:०४-९:३१


रात्र   २२:५८ -३:२०(पहाटे)