Central Railway : मुंबईकरांचा प्रवास सुकर करणाऱ्या मुंबई लोकलची एक गर्दीनं गजबजलेली मार्गिका म्हणजे मध्य रेल्वे. मुंबईच्या सीएसएमटी अर्थात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून मध्य रेल्वेची सूत्र चालवली जातात. दर दिवशी, दर मिनिटाला CSMT रेल्वे स्थानकामध्ये असणारी गर्दी कायमच विचार करायला भाग पाडते, ही एवढी माणसं येतता तरी कुठून आणि जातात कुठे? इथं तुम्ही या प्रश्नांमध्येच गुंतलेले असताना तिथं एक दुसरं सीएसएमटी उभं राहिलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काही महिन्यांपासून सीएसएमटी रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार अशी अनेक वृत्त पाहायला मिळाली. बऱेच आराखडेही समोर आले. पण, त्याआधीच सीएसएमटीची प्रतिकृती चक्क वरळीमध्ये उभी राहिली आहे. नेतेमंडळी आणि भलेभले तज्ज्ञही CSMT चं हे रुप पाहून थक्क होतील. कारण, इथं टीपले गेलेले बारकावे हैराण करून सोडत आहेत. गंमत म्हणजे इथं तुम्हीआम्ही घाईगडबडीत असताना तिथं वरळीमध्ये काही तरुणांनी मिळून दुसरं सीएसएमटी उभारलं याचा कोणालाच पत्ताही लागला नाही. पण, आता समोर आलेल्या एका व्हिडीओवर अनेकांच्याच नजरा खिळल्या. 


यात्रीगण कृपया ध्यान दे... 


कलाधिपती गणपती सध्या सर्वांच्याच घरी विराजमान झाले असून, आता याच गणरायांसाठी केलेल्या सजावटी सर्वांच्या नजरा वळवत आहेत. यंदाच्या वर्षी अनेक घरांमध्ये बाप्पांसाठी विविध कल्पनांवर आधारित आरास आणि देखावे साकारण्यात आले. यामध्ये मुंबईतील वरळी येथे असणाऱ्या आदर्श नगर सोसायटीमध्येही असाच एक देखावा साकारण्यात आला आहे. जिथं युनेस्कोचा जागतिक वारसा असणारं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस उभारण्यात आलं आहे. आतापर्यंत आपण ज्या सीएसएमटीची चर्चा केली ते हेच, गणरायासाठी उभं राहिलेलं CSMT.




गणपत बडे आणि कुटुंबीयांच्या या बाप्पासाठीची ही सजावट रोहित तोंडलेकर आणि साथीदारांनी केली असून, शेजारीपाजारी, मित्रमंडळी आणि कुटुंबातील सानथोर सर्वांचाच हातभार यात लागला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे सीएसएमटीचे अंतरंगही या देखाव्यामध्ये अत्यंत बारकाईनं टीपण्यात आले असल्यामुळं तो पाहताना आपणही भारावून जातो.