मुंबई : अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला तब्बल 25 दिवसांनंतर जामीन मंजूर झाला. गुरूवारी जामीन मंजूर झाल्यानंतर शनिवारी जेल प्रशासनाची कारवाई पूर्ण झाली आणि आर्यनची आर्थर रोड जेलमधून अखेर सुटका झाली. जेलमधून बाहेर आल्यानंतर त्याचं मन्नतमध्ये जंगी स्वागत करण्यात आलं. 25 दिवसांनंतर आर्यनला घरी घेवून जाण्यासाठी शाहरुख जेलबाहेर पोहोचला होता. महत्त्वाचं म्हणजे जेलमध्ये 25 दिवस राहिल्यानंतर आर्यनला मोठा धक्का बसला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आर्यनला या धसक्यातून बाहेर काढण्यासाठी शाहरुख आणि गौरीने मोठा निर्णय घेतला आहे. त्याच्यासाठी एक स्पेशल डाएट प्लॅन तयार केला आहे. या डाएट प्लॅनमध्ये काऊन्सिलिंगपासून हेल्थ चेकअपपर्यंत अनेक गोष्टींचा समावेश आहे. त्यामुळे आर्यनला पूर्वपदावर आणण्यासाठी मोठी मदत होणार आहे. आर्यनच्या प्रकृतीची काळजी घेण्यासाठी शाहरुख आणि गौरीने तज्ज्ञ डॉक्टरांची निवड केली आहे. 


‘बॉलिवूड लाईफ’ या वेबसाईटला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आर्यनची आरोग्य चाचणी करण्यात येणार आहेत. आर्यनची रक्त तपासणी केली जाणार आहे. जेलमध्ये राहिल्याने त्याच्या तब्येतीवर मोठा परिणाम झाला असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे ही विशेष तयारी करण्यात आली आहे. एवढंच नाही तर आर्यनसाठी विशेष काऊन्सलिंग सेशन आयोजित करण्यात आले आहे.


शारीरिक तपासणीसोबतच आर्यनच्या मानसिक आरोग्याचीही काळजी घेतली जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. ज्यामुळे आर्यनला या सगळ्या परिस्थितीतून बाहेर पडण्यास मदत होणार आहे. विशेष म्हणजे आर्यनला सर्वचं पार्ट्यांपासून दूर ठेवले जाणार आहे.