COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई :  गौरी लंकेश यांच्या मारेकऱ्यांच्या हिटलिस्टवर दिग्दर्शक आणि अभिनेते गिरीश कर्नाडही होते का, असा संशय आहे. कर्नाड यांच्यासह ज्ञानपीठ विजेते बी. टी. ललिता नाईक यांच्यासह प्रसिद्ध साहित्यिकही हिटलिस्टवर असल्याचा संशय आहे.


गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी परशुराम वाघमारे याला अटक करण्यात आलीय. त्याच्या डायरीमध्ये गिरीश कर्नाड यांच्यासह साहित्यिकांची नावं सापडली. वाघमारे हाच लंकेश यांचा मारेकरी आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत. वाघमारे आणि लंकेश यांच्या मारेकऱ्याचं सीसीटीव्ही फुटेजमध्ये बरंच साधर्म्य आहे.