भीमा-कोरेगाव प्रकरण; गौतम नवलखा यांना घरातच नजरकैदेत ठेवणार
गंभीर आजार आणि वृद्धत्वाच्या कारणांवरून गौतम नखलवा यांना एक महिन्यासाठी घरीच नजरकैदेत ठेवण्याची परवानगी गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने दिली.
स्वाती नाईक, झी मीडिया, नवी मुंबई : भीमा-कोरेगाव प्रकरणातील(Bhima-Koregaon case) आरोपी व मानवाधिकार कार्यकर्ता गौतम नवलखा(Gautam Navalkha) यांना घरातच नजरकैदेत ठेवले जाणार आहे. गंभीर आजार आणि वृद्धत्वाच्या कारणांवरून त्यांना एक महिन्यासाठी घरीच नजरकैदेत ठेवण्याची परवानगी गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने दिली.
मध्यवर्ती कारागृह तळोजा नवी मुंबई तुरुंगाऐवजी एका निवासस्थानी नवलखा यांना स्थानबद्ध करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यांना अनेक अटी घातल्या आहेत. यात मोबाईल, सोशल मिडीया आणि इंटरनेट वापरण्यास नवलखा यांना बंदी घातली गेली आहे.
नवी मुंबई मद्ये बेलापूर मधील एका घरात त्यांना पोलीस बंदोबस्त ठेऊन नजरकैदेत ठेवण्यात आले आहे.
कोण आहेत गौतम नवलखा
पत्रकार आणि मानवाधिकार कार्यकर्ता अशी गौतम नवलखा यांची ओळख आहे. नवलखा दिल्लीत राहतात. इकॉनॉमिक एंड पॉलिटिकल वीकली चे ते संपादकिय सल्लागारही आहेत. सुधा भारतद्वाज आणि त्यांनी कलम 1967 रद्द करण्याची मागणी केली होती. जम्मू काश्मीरमधील मानवाधिकारांबाबत त्यांनी बरेच लिखाण केले आहे.त्यांच्यावर पुण्याच्या विश्रामबाग पोलीस स्टेशनात एफआयआर दाखल करण्यात आलेली आहे. 8 जानेवारी 2018 रोजी दाखल करण्यात आलेल्या एफआयआरमध्ये सात महिन्यांनंतर 22 ऑगस्टला गौतम नवलखा यांचे नाव जोडले गेले.