मुंबई : सोमवारपासून मुंबईच्या बेस्ट बसेसमध्ये आता सामान्य लोकही प्रवास करू शकणार आहेत. अत्यावश्यक सेवेतील कर्मचा-यांबरोबरच आता खाजगी कार्यालयात जाणा-यांनाही प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. बेस्ट बसेस अधिक संख्येने यासाठी रस्त्यांवर उतरवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एका सीटवर केवळ एकच प्रवाशी बसण्यास मुभा राहणार असून केवळ पाच प्रवाशी उभे राहून प्रवास करु शकणार आहेत. सोशल डिस्टन्शिंगचे नियम पाळून बेस्ट बससेवा सोमवारपासून पूर्ववत केली जाणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याआधी फक्त अत्यावश्यक सेवेतील लोकांना बसने प्रवास करण्याची मुभा होती. पण आता इतर कर्मचाऱ्यांना देखील बसने प्रवास करता येणार आहे.


मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. देशातील सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळले असून मुंबईतही रुग्णांची संख्या अधिक आहे. मुंबई सारख्या अतिशय गर्दीच्या ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव चिंतेचा विषय आहे. सरकार हळूहळू सगळ्या गोष्टी पूर्ववत करत आहेत. पण या सोबतच कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यात सरकार किती यशस्वी होतंय हे देखील पाहावं लागणार आहे. याआधी बेस्ट कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण होत असल्याने देखील चिंतेचा विषय बनला आहे. 


याआधी सरकारी कर्मचाऱ्यांना कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देखील काढण्यात आले आहेत. आठवड्यातून एकदा तरी कर्मचाऱ्यांना कार्यालयात उपस्थित राहावं लागणार आहे.