मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहावीचा राहिलेला पेपर पुढे ढकलण्यात आला होता. मात्र आता कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावमुळे लॉकडाऊन वाढवण्यात आल्याने दहावीचा राहिलेला भूगोलचा पेपर रद्द करण्यात आल्याची घोषणा वर्षा गायकवाड यांनी केली आहे. बेस्ट ऑफ फाईव्ह बेसिसवर मार्क देण्यात येणार आहेत. नववी आणि अकरावीची परीक्षाही रद्द करण्यात आली आहे.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दहावीचा शिल्लक राहिलेला एक पेपर होणार नाही. दहावीचा शिल्लक राहिलेल्या पेपरबाबत मंडळाने विहित कार्यपद्धती अवलंबून गुण देण्याबाबत शिक्षण विभागाच्या मंडळाला सूचना देण्यात आल्या आहेत. नववी आणि अकरावीच्या दुसऱ्या सत्राची परीक्षा होणार नसून पहिल्या सत्रातील गुणांनुसार त्यांना पुढच्या वर्गात प्रवेश मिळणार आहे. पहिल्या सत्रातील गुणांनुसार विद्यार्थ्यांना पुढच्या वर्षात प्रवेश मिळणार असल्याचा निर्णय शालेय शिक्षण मंत्र्यांकडून घेण्यात आला आहे. लॉकडाऊन वाढवण्यात आल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.