मुंबई : जात वैधता प्रमाणपत्र मिळविण्यासाठी सरकारी कार्यालयाचे उंबरठे झिजवने नवे नाही. पण, आता तुमचा हा त्रास वचणार आहे. रक्ताच्या नात्यातील कोणत्याही एका व्यक्तिकडे असलेले जात प्रमाणपत्र यासाठी पुरे असणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जात वैधता प्रमाणपत्र मिळण्याची प्रक्रिया सुलभ व्हावी. तसेच, नागरिकांना होणारा त्रास वाचावा यासाठी राज्य मंत्रिमंडळाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्य निर्णयानुसार, रक्तातील नात्यात एकाकडे जात वैधता प्रमाणपत्र असल्यास दुस-याला वैधतेसाठी नवीन पुरावे सादर करण्याची गरज भासणार नाही.


सरकारच्या या निर्णयामुळे वडील, सख्खे चुलते किंवा वडिलांकडील रक्ताच्या नात्यातील इतर कोणत्याही व्यक्तीकडे उपलब्ध असणाऱ्या जात वैधता प्रमाणपत्राला महत्त्वाचा पुरावा मानून अर्जदारास जात प्रमाणपत्र तसेच जात वैधता प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. अनुसुचित जाती, विमुक्त जमाती, भटक्या जमाती तसंच ओबीसी वर्गातील नागरिकांना याचा मोठा फायदा होणार आहे.