घाटकोपर दुर्घटना : सुनील शितपच्या आर्किटेक्टला पोलिसांनी घेतले ताब्यात
घाटकोपरच्या दुर्घटनेप्रकरणी आरोपी सुनील शितपच्या आर्किटेक्टला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शितपच्या नर्सिंग होममध्ये सुरु असेलेल्या नूतनीकरणाच्या कामात इमारतीच्या मूळ ढाच्याला धक्का लागला. आणि इमारात जमीनदोस्त झाली असा आरोप आहे. नुतनीकरनाच्या कामासाठी नेमलेल्या आर्किेटेक्टला आज ताब्यात घेण्य़ात आलंय.
मुंबई : घाटकोपरच्या दुर्घटनेप्रकरणी आरोपी सुनील शितपच्या आर्किटेक्टला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शितपच्या नर्सिंग होममध्ये सुरु असेलेल्या नूतनीकरणाच्या कामात इमारतीच्या मूळ ढाच्याला धक्का लागला. आणि इमारात जमीनदोस्त झाली असा आरोप आहे. नुतनीकरनाच्या कामासाठी नेमलेल्या आर्किेटेक्टला आज ताब्यात घेण्य़ात आलंय.
दरम्यान, घाटकोपर दुर्घटनेप्रकरणी प्रमुख आरोपी सुनील शितपला दोन ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. शितपला विक्रोळी कोर्टात हजर करण्यात आलं. मात्र इमारत जुनी असल्याने कोसळली असून आपण कोणतंही चुकीचं काम केलं नाही असा दावा शितपनं कोर्टात केला.
मूळ बांधकामाशी कोणतीही छेडछाड केली नसल्याचंही त्यानं म्हटलंय. दरम्यान शितपवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. आर्किटेक्ट आणि कंत्राटदारावरही गुन्हा दाखल करण्यात येणार असून साहित्य ताब्यात घेण्याचं काम सुरु आहे.
घाटकोपरच्या दामोदर पार्क परिसरातील सिद्धीसाई अपार्टमेंट कोसळून सतरा जणांचा मृत्यू झाला होता. याच इमारतीच्या तळमजल्यावर शितपचं नर्सिंग होम होतं. या नर्सिंग होममध्ये नुतनीकरणाचा घाट घातला होता. यादरम्यान इमारतीच्या मूळ पायाला धक्का लागल्यानं दुर्घटना घडली, असा स्थानिकांचा आरोप आहे.