Bandra Worli Sea Link Suicide: मुंबईतील वांद्रे वरळी सीलिंकवरुन समुद्रात उडी घेत एका व्यावसायिकाने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. भावेश सेठ असं या व्यक्तीचे नाव असून कर्जबाजारीपणामुळं आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती समोर येत आहे. पोलिसांना या प्रकरणात सुसाडट नोटदेखील सापडली आहे. भावेश सेठ हे घाटकोपर येथे राहत होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सेठ यांचा बॉल बेरिंगचा व्यवसाय आहे. बुधवारी ते एका अज्ञात कारमधून लिफ्ट मागून वांद्रे वरळी सि लिंकजवळ आले होते. त्यांनी कारचालकाला आपली कार बिघडल्याचे सांगितले व त्यांच्याकडून लिफ्ट मागितली. त्या कारमधून ते वरळीच्या दिशेने सी लिंकवर आले. त्यानंतर दुपारी त्यांनी त्यांच्या मुलाला व्हिडिओ कॉल केला. तसंच, मी वांद्रे वरळी सी लिंकवर असून आत्महत्या करत आहे असं सांगत समुद्रात उडी घेतली. 


सेठ यांनी समुद्रात उडी घेताना काही नागरिकांनी बघितली. मात्र, त्यांना वाचवण्यात अपयश आले. त्यांनी लगेचच पोलिसांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर सेठ यांची हेलिकॉप्टरच्या मदतीने शोधकार्य सुरू होते. तसंच, कोस्ट गार्ड आणि अन्य बचाव पथकेदेखील सेठ यांचा शोध घेत होते. अखेर अथक प्रयत्नानंतर त्यांचा मृतदेह सापडला. 


सेठ यांनी ज्या कारमधून लिफ्ट घेतली होती. त्याच कारमध्ये त्यांनी लिहलेली सुसाइड नोटदेखील सापडली आहे. डोक्यावर कर्जाचा डोंगर असल्यामुळं त्यांनी हे पाऊल उचलल्याची चर्चा आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी सेठ यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आहे. 


दरम्यान, वांद्रे वरळी सी लिंकवरुन आत्महत्या केल्याच्या घटनां वारंवार घडत आहे. या वाढत्या घटनांमुळं मुंबई उच्च न्यायालयात एक याचिकादेखील दाखल करण्यात आली होती. त्यानंतर कोर्टाने सरकारकडून उत्तर मागितले होते. त्यानंतर इथे सीसीटीव्ही कॅमेरा लावून सुरक्षा वाढवण्यात आली होती. याआधीही 45 वर्षांच्या विक्रम वासुदेव यांनी वांद्रे वरळी सीलिंकवरुन आत्महत्या केली होती. ते त्यांच्या मुलाच्या मृत्यूमुळं डिप्रेशनमध्ये होते. 


वांद्रे वरळी सीलिंकवरुन आत्महत्या


विक्रम वासुदेव यांनी याप्रकारेच संध्याकाळी 7 वाजता हाजी अलीवरुन लीलावती रुग्णालयासाठी टॅक्सी बोलवली होती. मात्र लीलावतीला गेल्यानंतर त्यांनी पुन्हा टॅक्सी हजी अलीकडे घेण्यास सांगितली. टॅक्सी वांद्रे वरळी सीलिंककडे येताच लघुशंकेला जाण्याच्या बहाण्याने ते खाली उतरले आणि समुद्रात उडी घेतली.