तुमच्याकडून चुकून कोणाला UPI पेमेंट झालंय, घाबरू नका! 'हे' करा पैसे परत मिळतील

तुम्ही UPI च्या मदतीने पेमेंट करत असाताना तुमच्याकडून कोणाला तरी चुकून पैसे पाठवले जाण्याची घटना घडू शकते. मग अशा परिस्थितीत घाबरून न जाता तुम्ही लगेचच योग्य पावले उचलल्यास तुमचे पैसे परत मिळू शकतात. 

Sep 14, 2024, 15:42 PM IST
1/7

UPI Payment: यूपाआय ही एक अशी सिस्टम आहे ज्याद्वारे आपण आपल्या स्मार्टफोनचा वापर करून कोणत्याही व्यक्तीच्या बॅंक अकाऊंटमध्ये पैसे जमा करू शकतो किंवा मिळवू शकतो. याद्वारे सुरक्षित, जलद आणि सोप्या पद्धतीने डिजिटल व्यवहार करता येतात. भारतात मोठ्याप्रमाणात असे व्यवहार केले जातात. यामुळे तुम्हाला तुमच्या बँक अकाऊंटमधून व्यवहार करण्याची परवानगी मिळते. 

2/7

पण असे व्यवहार करताना जर तुमच्याकडून चुकून दुसऱ्या कोणाला UPI पेमेंट झाले तर काय कराल? अशा परिस्थितीत तुम्हाला घाबरण्याची गरज नाही. यासाठी असे काही पर्याय आहेत ज्याद्वारे तुम्ही तुमचे पैसे परत मिळवू शकता. पण यासाठी नेमके काय करावे लागेल चला जाणून घेऊया.

3/7

त्या व्यक्तीशी बोला

तुमच्याकडून ज्या व्यक्तीला चुकून UPI पेमेंट केले आहे त्या व्यक्तीशी त्वरित संपर्क करा. सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही त्या व्यक्तीला पैसे परत करण्याची विनंती करू शकता.

4/7

बॅंक किंवा UPI अ‍ॅपला संपर्क करा

तुम्ही ज्या बॅंक किंवा UPI अ‍ॅपचा वापर करून हे पैसे पाठवले आहेत त्यांच्या कस्टमर केयरला लगेच संपर्क करा. त्यांना या संपूर्ण घटनेबद्दल सविस्तर सांगा आणि तुमचे ट्रांजेक्शन डिटेल्सही त्यांना द्या.   

5/7

पोलिसांकडे तक्रार करा

जर तुम्हाला बॅंक किंवा UPI अ‍ॅपकडून योग्य ती मदत मिळाली नाही, तर तुम्ही पोलिसाकडे तक्रार करू शकता. तुम्ही दिलेल्या माहितीवरून पोलिस चौकशी करून तुमचे पैसे परत मिळवून देण्यासाठी मदत करू शकतात. 

6/7

UPI पेमेंट सिस्टम प्रोव्हायडरशी संपर्क करा

तुम्ही ज्या UPI सिस्टमचा उपयोग करतात, जसे की गुगल पे, फोन पे, पेटीएम सारखे अ‍ॅप त्यांच्या कस्टमर केयरला तुम्ही संपर्क करू शकता. ते तुमचे ट्रांजेक्शन कॅन्सल करून तुमचे पैसे परत मिळवून देण्यास मदत करू शकतात.

7/7

लगेचच कारवाई करा

जेवढ्या लवकर तुम्ही यावर कारवाई कराल तेवढ्या लवकर तुम्हाला तुमचे पैसे परत मिळू शकतात. याशिवाय ट्रांजेक्शन डिटेल्सचा स्क्रीनशॉट, बॅंक स्टेटमेंट आणि यासंबंधीत इतर डॉक्यूमेंट्सही आपल्या जवळ ठेवा.