घाटकोपरमध्ये पुन्हा मराठी VS गुजराती; ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना सोसायटीत मज्जाव
Marathi Vs Gujarati row: मराठी विरुद्ध गुजराती असा वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे. घाटकोपरमध्ये मोठा तणाव निर्माण झाला होता.
Marathi Vs Gujarati row: घाटकोपरमध्ये गुजराती बहुल सोसायटी महाविकास आघाडीचे उमेदवार संजय दिना पाटील यांचे पॅम्प्लेट्स वाटण्यास ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना मज्जाव करण्यात आल्याचा आरोप शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. त्यामुळं पुन्हा एकदा मराठी VS गुजराती वाद चव्हाट्यावर आला आहे.
शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या आरोपानुसार, सोसायटीतील लोकांकडून मराठी माणसाला बिल्डिंगमध्ये प्रचार करायला देणार नाही अशी भाषा वापरण्यात आली आहे. त्याउलट मिहिर कोटेचा यांच्या पॅम्प्लेट्स या सोसायटीत वाटण्यात आले होते त्यामुळे काही वेळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. पोलिसांनी मध्यस्थी करून अखेर या कार्यकर्त्यांना इमारतीत प्रवेश दिला त्यामुळे पुन्हा एकदा मराठी विरुद्ध गुजराती असा वाद ईशान्य मुंबईत रंगताना दिसतोय.ट
काय घडलं नेमकं?
ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात गुजराती मतदारांची संख्या अधिक आहे. घाटकोपर मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते उमेदवाराचा प्रचार करत होते. मात्र, घाटकोपर पश्चिम परिसरातील एका सोसायटीत त्यांना प्रवेश नाकारण्यात आला. तुम्हाला सोसायटीत प्रचार करता येणार नाही, असे सोसायटीतील सदस्यांकडून सांगण्यात आले. ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना मज्जाव करण्यात आल्याने काही काळ येथे तणावाचे वातावरण होते. मात्र, पोलिसांनी मध्यस्थी करत हा परिस्थिती नियंत्रणात आणली.
संजय राऊतांची टीका
घाटकोपरमधील मराठी- शिवसेना वादावर संजय राऊतांनीदेखील प्रतिक्रिया दिली आहे. काल घाटकोपर मधल्या एका सोसायटीमध्ये गुजराती राहतात म्हणून शिवसैनिकांना रोखले. कारण ते मराठी आहेत म्हणून. बुळचट शिवसेना काय करते. XX शिवसेना काय करते. मराठी माणसाच्या विरुद्ध चाललेले षडयंत्र आणि कारस्थान आहे, असा आरोप संजय राऊतांनी केला आहे.
शिंदेची सेना व फडणवीसांना आव्हान आहे. आम्ही बघू काय करायचं आहे ते उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेने आव्हान स्वीकारला आहे. आमची शिवसेना खरी म्हणणारे ते काय बोलतात ह्याच्यावर ते स्पष्ट व्हायला पाहिजे, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.