COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई : दरवर्षीप्रमाणे यंदाही भटक्यांना एकत्र येण्यासाठी 'गिरिमित्र संमेलन'च्या माध्यमातून व्यासपीठ उपलब्ध झालंय. १४ आणि १५ जुलै रोजी मुलुंडच्या महाराष्ट्र सेवा संघात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय. 'गिर्यारोहण - नवी क्षितिजे, नवी आव्हाने' याची व्याप्ती नेमकी काय आहे, त्यातील घडामोडी काय आहेत तसेच त्यातील संधी आणि आव्हानांचा आढावा या निमित्ताने घेतला जाईल. या कार्यक्रमाच्या निमित्तानं देश-विदेशातील गिर्यारोहकांशी संवाद साधता येणार आहे. या निमित्तानं थरारक मोहिमांचे अनुभव ऑडिओ-व्हिडिओच्या माध्यमातून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. 'गिरिमित्र'नं आयोजित केलेल्या स्पर्धेत 'उत्क्रांती' या शॉर्टफिल्मनं पहिला क्रमांक पटकावलाय.


गिरिमित्र सन्मान पुढीलप्रमाणे...


गिर्यारोहणाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गिर्यारोहकांचा आणि संस्थांचा या निमित्तानं गौरवही केला जाईल. यंदाचा 'गिरिमित्र जीवनगौरव सन्मान' नाशिकचे ज्येष्ठ गिर्यारोहक अविनाश जोशी यांना देण्यात येणार आहे. तसंच अभिजीत बर्मन उर्फ बाँग, मिलिंद पोटे यांना 'गिरिमित्र गिर्यारोहक सन्मान' तर विलास जोशी, निरंजन पळसुले आणि डॉ. संदीप श्रोत्री यांना 'गिरिमित्र गिर्यारोहक संस्थात्मक सन्मान' जाहीर करण्यात आलाय. शैलभ्रमर मुंबई आणि यंग ब्लड अॅडव्हेंचर - पोलादपूर या संस्थांना 'गिरिमित्र संस्था सन्मान' जाहीर करण्यात आलाय. शिवदुर्ग मित्र - लोणावळा या संस्थेला 'गिरिमित्र शरद ओवळेकर विशेष सन्माना'नं गौरविण्यात येणार आहे. 


ऑडिओ-व्हिडिओ सादरीकरण स्पर्धा विजेते...


प्रथम क्रमांक : माहितीपटाचे नाव : उत्क्रांती (Evolution)


द्वितीय क्रमांक : माहितीपटाचे नाव : Mt. मानसलू  मोहीम


तृतीय क्रमांक :  माहितीपटाचे नाव : गोएचा ला


उत्तेजनार्थ : माहितीपटाचे नाव : बिटवीन इयर्स


उत्तेजनार्थ : माहितीपटाचे नाव : सामानगड संवर्धन