मुंबई : देवेंद्र फडणवीस सरकारमधील मंत्री गिरीश महाजन यांनी आपल्या वक्तव्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे. कुणाच्याही भावना दुखावण्याचा माझा हेतू नसल्याचं यावेळी गिरीश महाजन यांनी स्पष्ट केलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तसेच दारू खपवण्यासाठी दारूला महिलांची नावे द्या, अशा वादग्रस्त वक्तव्यावर गिरीश महाजन यांनी भलं मोठं स्पष्टीकरण दिलं आहे.


गिरीश महाजन यांचं स्पष्टीकरण


परवा नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तापी साखर कारखान्यात कार्यक्रम होता. त्यामध्ये माझे भाषण झाले. दारू विकली जात नाही हा विषय निघाला. राज्यात 5 - 6 ब्रँड आहेत असून त्यालाच डिमांड आहे असे सांगण्यात आले. 


तेव्हा त्या अनुशंगाने भाषण करतांना मी सहज म्हणालो, माझ्याकडून व्यक्तव्य केले गेले. सहज केलेल्या विनोदाचा तो भाग होता. कोणत्याही महिलांना दुःखवण्याचा हेतू नव्हता. माझी काही हजार भाषणे झाली. मी असे कधी केले नाही, चुकीचे बोललो नाही. तेव्हा कालच्या  भाषणात माझा असा हेतू माझा नव्हता.


ही नकळत झालेली चूक आहे


माफ़ी मागण्याची मागणी केली आहे. ही नकळत झालेली चूक आहे, तेव्हा दिलगीरी व्यक्त करतो, कोणी दुखावले गेले असेल तर मी माफ़ी मागती. 


कोणी टीका केली की माझी उतरली असेल. तेव्हा मी सांगू इच्छितो की मला कुठलेही व्यसन नाही, मी चहा सुद्धा घेत नाही. उलट मी तंबाखू वगैरे असे व्यसन दूर करण्यासाठी उपचार करण्यासाठी वैद्यकीय कॅम्प घेतो.