मुंबई : मॉलमध्ये (Mall) पालकांसोबत जाणाऱ्या लहान मुलांना आकर्षित करण्यासाठी तिथे किड्स झोन (Kids Zone) नक्कीच असतो. या किड्स झोनमध्ये वेगवेगळे गेम्स (Game) असतात. अशाच एका चिमुकलीला मॉलमध्ये (Mall) खेळणं चांगलेच महागात पडले. मॉलमध्ये खेळत असताना एका साडेतीन वर्षांच्या मुलीचा जीव गेलाय. त्यामुळे आता मॉलमध्ये आपल्या मुलांना घेऊन जात असाल तर नक्कीच काळजी घेण्याची गरज आहे. (girl died after sustaining injuries in a freak accident at Kids Zone at Neelyog Mall in Ghatkopar) 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

घाटकोपरच्या (Ghatkopar) निलयोग मॉलमधील (Neelyog Mall) किड्स झोनमध्ये रविवारी झालेल्या अपघातात साडेतीन वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  कुटुंबाने औपचारिक तक्रार न केल्याने स्थानिक पंतनगर पोलिसांनी या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. 


पंत नगर पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्याने सांगितले की, रविवारी संध्याकाळी ही घटना घडली जेव्हा साडेतीन वर्षांच्या मुलगी तिच्या पालकांसह निलयोग मॉलमध्ये गेली होती. हे कुटुंब मॉलच्या पाचव्या मजल्यावर असलेल्या किड्स झोनमध्ये गेले आणि मुलगी तिथे खेळू लागली. घसरगुंडीवरुन घसरत असताना ती घसरुन खाली पडली आणि तिच्या डोक्याला दुखापत झाली. वडिलांना तिला घेऊन तात्काळ फोर्टिस रुग्णालयात गाठले. सायंकाळी 5.15 च्या सुमारास त्याच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी ती पडून डोक्याला मार लागल्याने मृत घोषित केले.


"पालकांनी कोणाच्याही विरोधात तक्रार केली नसल्यामुळे आम्ही या प्रकरणी एफआयआर नोंदवला नाही. या टप्प्यावर, आमच्याकडून अपघाती मृत्यूचा अहवाल घेण्यात आला आहे,"असे पंत नगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक रविदत्त सावंत यांनी सांगितले.


निलयोग मॉल किड्स झोनमध्ये घसरगुंडीचा आनंद लुटत असताना मुलगी खाली पडली. डोक्याला मार बसल्याने ती बेशुद्ध पडली. मात्र मेंदूत रक्तस्राव झाल्याने या चिमुकलीचा मृत्यू झाला आहे.