मुंबई : मृत्यू कुठं आणि कशी मिठी मारेल याचं हे धक्कादायक वृत्त. मुंबईतल्या कांदिवलीत सीएम चषक स्पर्देध नृत्य करताना एका १२ वर्षांच्या मुलीचा दुर्दैवी अंत झालाय. अनिषा शर्मा असं या मुलीचं नाव असून ती कांदिवलीतल्या लालजीपाडा या परिसरातली आहे. नृत्य करत असताना तिला अचानक भोवळ आली आणि ती स्टेजवरच कोसळली. मात्र जागीच तिचा मृ्त्यू झाला. त्यामुळे हृदयविकाराच्या झटक्यानं तिचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येतो आहे.


अनिषाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. त्यामुळे आता शवविच्छेदनानंतर तिच्या मृत्यूचं कारण स्पष्ट होणार आहे. यासंदर्भात या कार्यक्रमाचे आयोजक आणि भाजपचे नगरसेवक कमलेश यादव यांनी झी २४ तासला फोनवरून माहिती दिली.