मुंबई : शेतक-यांच्या थकबाकीचा विचार न करता, त्यांना खरीप हंगामासाठी तत्काळ नवीन पीककर्ज द्या, असे आदेश राज्य सरकारनं जिल्हा बँकांना दिलेत. याबाबतचा जीआर म्हणजे शासन निर्णय काढण्यात येणार असून, संध्याकाळपर्यंत हे आदेश बँकांपर्यंत पोहोचलेले असतील, अशी घोषणा सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी केलीय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

झी 24 तासवरील रोखठोक कार्यक्रमात बोलताना त्यांनी ही घोषणा केली. त्याशिवाय कर्जमाफीबाबत शेतक-यांच्या तक्रारींचं निवारण करण्यासाठी सरकार लवकरच हेल्पलाइन सुरू करणार आहे, असंही त्यांनी जाहीर केलं. यासंदर्भात काही अडचणी असतील तर शेतक-यांनी थेट माझ्या 99233 33344 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा, असं आवाहन देखील देशमुखांनी यावेळी केलं.