नवरात्रीपूर्वी सोन्याचं दर गडगडले; आज 24, 22 आणि 18 कॅरेटचे भाव किती?
Gold Rate Today : महिन्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याचे दर घसरले आहेत. आज 24, 22 आणि 18 कॅरेटचे भाव किती आहे जाणून घ्या.
Gold Rate Today : ऑक्टोबर महिना हा नवरात्री, दसरा आणि दिवाळी सणासुदीने भरलेला आहे. दसरा आणि दिवाळी सणाला ग्राहक मोठ्या प्रमाणात सोने आणि चांदीची खरेदी करतात. 3 ऑक्टोबरपासून नवरात्रोत्सवाला सुरुवात होणार आहे. तुम्हाला जर सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही संधी सोडू नका. कारण नवरात्रोत्सवापूर्वी महिन्याचा पहिलाच दिवशी सोन्या दरात घसरण झालंय. (gold and silver rate today 1 october 2024 24 22 18 carat in mumbai pune nashik)
गुडरिटर्न्सच्या आकडेवारीनुसार, मंगळवार (1 ऑक्टोबर 2024) 24 कॅरेट सोन्याच्या दरात 3300 रुपये प्रति 100 ग्रॅम इतकी घसरण झाली आहे. यामुळे 100 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 7,72,400 रुपयांवरुन 7,69,100 रुपये इतका झाला आहे. 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याच्या दरात 330 रुपयांची घसरण झाली आहे. यामुळे हा दर 77,240 रुपयांवरुन 76,910 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका झाला आहे.
मुंबई - पुण्यात कसे असतील सोन्याचे दर?
24 कॅरेट सोन्याचा आजचा दर (24 Carat gold rate today)
मुंबई 76,910 रुपये
पुणे 76,910 रुपये
नागपूर 76,910 रुपये
कोल्हापूर 76,910 रुपये
जळगाव 76,910 रुपये
सांगली 76,910 रुपये
बारामती 76,910 रुपये