आशिष अम्बाडे, झी मीडिया, चंद्रपूर : कोकण (Konkan) आणि विदर्भ (Vidarbha) म्हणजे निसर्गाचं वरदान लाभलेले महाराष्ट्राचे (Maharashtra) दोन भूभाग. निसर्गानं या भागांवरची कृपादृष्टी कायम ठेवलीय. कारण या दोन जिल्ह्यांमध्ये सापडल्यात चक्क सोन्याच्या खाणी (Gold Mine). कोकणातील सिंधुदुर्ग आणि विदर्भातील चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यात मिंझरी आणि बामणी या भागात सोन्याचे दोन ब्लॉक आढळलेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाराष्ट्रात सोन्याच्या खाणी 
- चंद्रपुरात आधीपासूनच कोळशाच्या खाणी आहेत
- त्याशिवाय तांबे, प्लॅटिनम, दुर्मिळ रथेनियम, रेडिअम, इरेडिअम असे मौल्यवान धातूही भूगर्भात लपलेत
- आता केंद्र सरकारच्या खनिकर्म विभागानं सोन्याच्या खाणी सापडल्याचा अहवाल दिलाय
- तर राज्याच्या खनिकर्म विभागानं त्यानुसार चाचणी सुरू केलीय


विशेष म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनीही सोन्याच्या खाणी सापडल्याच्या वृत्ताला दुजोरा दिलाय. शिंदे-फडणवीस सरकारच्या काळात सोन्याची खाण मिळाली तर ती महाराष्ट्रासाठी मोठी उपलब्धी असेल, असंही मुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हटलं. तसंच  राज्याच्या भूगर्भात खनिजांचा साठा (Underground Mineral) आढळून आला तर गडचिरोलीसारख्या दुर्गम भागात देशातील सर्वात मोठा स्टील प्रकल्प (Steel Project) सुरु करु शकतो, असा विश्वास मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केलाय. राज्यात खनिकर्म संशोधन संस्था सुरु करुन सोने खान व्यवसायातील अडचणी दूर करुन राज्याच्या महसूलात वाढ होण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका कार्यक्रमात दिले होते.


महाराष्ट्राच्या भूगर्भात सोन्यासह विविध मौल्यवान धातूंचा खजिनाच दडलाय. हा खजिना बाहेर काढला तर राज्याच्या विकासासाठी मोठा हातभार लागणाराय.