मुंबई : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असणाऱ्या अक्षय तृतीयेला बाजारात गर्दी दिसून येत आहे. मुहूर्ताच्या सोने खरेदीसाठी ग्राहकांची लगबग दिसून येत आहे. दरम्यान, मुंबईत सोन्याचा भाव तोळ्यामागे ३१ हजार रुपयांपुढे गेलाय. अक्षय तृतीयेच्या निमित्ताने अनेकजण सोने खरेदी करत आहेत. त्यामुळे सोने दरात वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे.


अक्षय तृतीयेच्या निमित्ताने सोन्याला झळाली


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेले दोन दिवस सोने बाजारात घसरण पाहायला मिळाली. सोन्याचा दर ३० हजार ते ३१,५०० घरात होता. मात्र गेल्या वर्षीपेक्षा यंदा सोने खरेदी अधिक होण्याची शक्यताही वर्तविली गेली आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे गुंतवणूकदारांचा सोन्याकडे  कल वाढत असल्याने ही दर वाढण्याचा अंदाज आहे.मात्र, साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या आजच्या, बुधवारच्या अक्षय तृतीयेच्या निमित्ताने सोन्याला झळाली मिळाली आहे. शहरात सोन्याचा भाव तोळ्यामागे ३२ हजार रुपये एवढा राहिला आहे.


मागणी वाढली, सोने दराची घसरण थांबली


मुंबईतील सराफा बाजारात गेल्या काही दिवसांपासून स्टॅण्डर्ड सोन्याचा भाव वाढतोय. तसेच चांदीच्या दरांमध्येही वाढ दिसून आली आहे. या दरम्यान सोन्याचा १० ग्रॅमचा दर ३२ हजारांच्या घरात राहिला आहे. तर चांदीचा किलोसाठीचा भाव ३८ हजारांपर्यंत पोहोचला आहे. तसेच लग्न सोहळ्यांमुळे दागिन्यांची मागणी वाढली आहे.त्यामुळे सोने दराची घसरण थांबून दरवाढ होताना दिसत आहे.