Gold Silver Price Today : सोने-चांदीचे दरामंध्ये गेल्या काही दिवसांपासून घसरण पहायला मिळत होती. कोरोना काळात सोन्याच्या दराने उच्चांक गाठला होता. दरम्यान सध्या सोन्याच्या दरांमध्ये फारसा बदल झालेला नाही. तर चांदीच्या दरांमध्ये आज वाढ झाली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोना काळात सोन्याच्या दरांनी उच्चांक गाठला होता. ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याचे दर प्रतितोळा 55 हजारांच्या पुढे गेले होते. त्यातुलनेत सध्या सोन्याच्या दरांनी 10 हजारापेक्षा जास्त घसरण नोंदवली आहे. कालच्या तुलनेत सोने प्रतितोळा 10 रुपयांनी वाढले आहे. तर चांदीच्या दरात प्रतिकिलो 200 रुपयांनी वाढ झाली आहे. 


आज मुंबईतील सोन्याचे दर 


  • 22 कॅरेट 43,720 प्रतितोळा

  • 24 कॅरेट 44,720 प्रतितोळा 


आज मुंबईतील चांदीचे दर


  • प्रतिकिलो 67,600 


मागील आठवड्यात 9 मार्च रोजी 22 कॅरेट सोन्याच्या दरांनी 43,430 रुपये प्रतितोळा इतकी घसरण नोंदवली होती. तर 5 मार्च रोजी चांदीचे दर प्रतिकिलो 65,420  रुपये इतके उतरले होते. 


सोने चांदीच्या दरांमध्ये झालेल्या घसरणीनंतर अद्यापही सोन्याच्या दरांमध्ये फारशी वाढ झालेली नाही. त्यामुळे गुंतवणूकदार आणि किरकोळ खरेदीदारांना अद्यापही चांगली संधी असल्याचे सांगितले जात आहे.