Gold Price Today | सोने-चांदीच्या किंमतीत मोठी घट; रेकॉर्ड स्तरावरून `इतक्या` रुपयांनी स्वस्त
जर तुम्ही सोने चांदी खरेदी करण्याचा विचार करीत असाल तर, सध्या तुमच्यासाठी चांगली संधी आहे. या आठवड्याच्या चौथ्या व्यवहाराच्या दिवशीदेखील सोन्याच्या दरांमध्ये घसरण नोंदवली गेली आहे.
मुंबई : जर तुम्ही सोने चांदी खरेदी करण्याचा विचार करीत असाल तर, सध्या तुमच्यासाठी चांगली संधी आहे. या आठवड्याच्या चौथ्या व्यवहाराच्या दिवशीदेखील सोन्याच्या दरांमध्ये घसरण नोंदवली गेली आहे. आपल्या उच्चांकी दरांवरून सोने तब्बल 5500 रुपयांनी स्वस्त झाले आहे.
Gold Price Today | आज मल्टीकमोडिटी एक्स्चेंजमध्ये (MCX)मध्ये सोने चांदीचा भाव 151 रुपयांनी घसरून 50753 रुपये प्रति ग्रॅमवर ट्रेड करीत आहे. आज सकाळी ट्रेडिंगची सुरूवात झाली तेव्हा सोने 50800 रुपये प्रति ग्रॅमवर ट्रेड करीत होते. चांदीच्या दरांत देखील 438 रुपयांनी घसरण होऊन, 60210 रुपये प्रति किलो इतके झाले आहे.
मुंबईतील सोन्याचा भाव 51,990 रुपये प्रति किलो इतका होता. तर चांदीचा भाव 6,050 रुपये प्रति किलो इतके होता.
सोन्याचे भाव रेकॉर्ड उच्चांकीवरून साधारण 5500 रुपये प्रति तोळ्यांनी स्वस्त मिळत आहे. सोन्याचा आतापर्यंतचा उच्चांकी भाव 50610 रुपये प्रति ग्रॅम इतके आहे.