मुंबई : सोन्याच्या किंमतीत मोठी घट झाली आहे. स्थानिक सराफांकडून सोन्याची मागणी घटल्याने, दिल्ली सराफ बाजारात सोन्याचा भाव ९० रूपयांनी घसरला आहे. यामुळे सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम ३१ हजार ९५० रूपये झाला आहे. व्यावसायिक संस्था, नाणी बनवण्याच्या उद्योगात तेडी नसल्याने, चांदी देखील २०० रूपयांनी घसरली आहे. चांदीचा भाव ३७ हजार ८०० रूपये प्रतिकिलो झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सराफा बाजारातील तज्ञांच्या मते जागतिक स्तरावर असलेली कमजोर जागतिक संकेत. स्थानिक सोनारांकडून तसेच किरकोळ बाजारातील कारागिरांकडून कमी होत चाललेली मागणी, यामुळे सोन्याचे भाव घसरले आहेत.


दिल्ली सराफ बाजारात 99.9 टक्के आणि 99.5 टक्के शुद्ध सोन्याचा भाव ९०-९० रूपयांनी घसरला आहे. 99.9 टक्के शुद्ध सोन्याचा भाव प्रति १० ग्रँम ३१ हजार ९५० रूपये, तर 99.5 टक्के शुद्ध सोन्याचा भाव ३१ हजार ८०० रूपये एवढा आहे. याआधी गुरूवारी सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम ९० रूपयाने वाढला होता.