कर्जमाफीसह विविध मागण्यांबाबत उच्चाधिकार मंत्रिगट नियुक्त
कर्जमाफीसह शेतकर्यांच्या विविध मागण्यांबाबत चर्चेसाठी मुख्यमंत्र्यांनी उच्चाधिकार मंत्रिगट नियुक्त केला आहे. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्त्वात या मंत्रिगटाची नियुक्ती करण्यात आली आहे. या मंत्रिगटात राज्याचे कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, सहकारमंत्री सुभाष देशमुख, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि परिवहन मंत्री दिवाकर रावते यांचा समावेश आहे.
मुंबई : कर्जमाफीसह शेतकर्यांच्या विविध मागण्यांबाबत चर्चेसाठी मुख्यमंत्र्यांनी उच्चाधिकार मंत्रिगट नियुक्त केला आहे. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्त्वात या मंत्रिगटाची नियुक्ती करण्यात आली आहे. या मंत्रिगटात राज्याचे कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, सहकारमंत्री सुभाष देशमुख, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि परिवहन मंत्री दिवाकर रावते यांचा समावेश आहे.
हा उच्चाधिकार मंत्रिगट सर्व शेतकरी नेत्यांशी चर्चा करेल आणि या सर्व मागण्यासंदर्भात आपला प्रस्ताव निर्णयार्थ शासनाकडे सादर करणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिलीय. तर मंत्रीगटाशी सुकाणू समितीची चर्चेची तयारी आहे. मात्र सरकारनं वेळकाढूपणा करू नये, अशी प्रतिक्रिया शेतकरी नेते रघूनाथ दादा पाटील यांनी दिली आहे.