गुडन्यूज : मध्य रेल्वे ७४ स्थानकांवर बसविणार सरकते जिने
मध्य रेल्वेने येत्या काही महिन्यांत विविध स्थानकांवर ७४ नवीन सरकते जिने बसविण्याचा निर्णय घेतलाय. सीएसएमटी ते कल्याण, कर्जत, कसाराप्रमाणेच हार्बरवर मार्गावरही सरकते जिने बसवले जाणार आहेत.
मुंबई : मध्य रेल्वेने येत्या काही महिन्यांत विविध स्थानकांवर ७४ नवीन सरकते जिने बसविण्याचा निर्णय घेतलाय. सीएसएमटी ते कल्याण, कर्जत, कसाराप्रमाणेच हार्बरवर मार्गावरही सरकते जिने बसवले जाणार आहेत.
मध्य रेल्वेप्रमाणेच मुंबई रेल्वे विकास महामंडळ कॉर्पोरेट कंपन्यांच्या सहकार्यानं काही स्थानकांवर सरकते जिने बसविले जातील. लोकल स्थानकांमधील गर्दी पाहता सरकत्या जिन्यांच्या सहाय्यानं प्रवाशांना जलदगतीनं स्थानकाबाहेर पडण्यास वा अन्य प्लॅटफॉर्मवर जाण्यास मदत होते.
स्थानकात एकापाठोपाठ लोकल आल्यानंतर सरकते जिने असलेल्या ठिकाणी प्रवाशांची कोंडी होत नाही. ही संकल्पना प्रवाशांना पसंत पडली आहे. पश्चिम, मध्य रेल्वे आणि हार्बरवर काही स्थानकांत सरकते जिने असून त्यात वाढ करण्याचा निर्णय रेल्वेने घेतलाय.