विद्युत महामंडळाच्या कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर
ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी तिन्ही विद्युत महामंडळाच्या खात्यासाठी बोनस जाहीर झालाय.
मुंबई : ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी तिन्ही विद्युत महामंडळाच्या खात्यासाठी बोनस जाहीर झालाय.
महावितरण, पारेषण आणि महानिर्मिती कंपन्यांना बोनस जाहीर केलाय. या वर्षी 13,500 रुपयांचा बोनस मिळणार आहे. एकूण 86 हजार कर्मचाऱ्यांना बोनसचा लाभ मिळणार आहे. वीज सेवक किंवा वीज सहाय्यक यांनाही 7,500 रुपयांचा बोनस मिळणार आहे.
दरम्यान, ऊर्जा खाते लोडशेडींग प्रश्नावरही पूर्णपणे कार्यरत आहे. कोळशांच्या गाड्या राज्यात दाखल होत आहेत. पुढील 21 दिवसांसाठी कोळश्याचा स्टॉक करण्याचा प्रयत्न असेल. उपलब्ध कोळशाचा सहा दिवस स्टॉक आहे ग्राहकांना वीज पुरवण्यासाठी 2100 मेगा वाट वीज राज्याने वीज विकत घेतलीय.