मध्य-पश्चिम रेल्वेची गणेशभक्तांसाठी खुशखबर
लाडक्या बप्पासाठी मध्य आणि पश्चिम रेल्वेकडून जादा लोकलचे नियोजन
मुंबई : मध्य रेल्वेनं मुंबईतील गणेशभक्तांना खुशखबर दिलीय. लाडक्या बप्पासाठी मध्य आणि पश्चिम रेल्वेकडून जादा लोकलचे नियोजन करण्यात आले आहे. मध्य रेल्वेवर गणेशोत्सवाच्या काळात पाच दिवसांसाठी मध्यरात्री एक विशेष लोकल चालविण्यात येणार आहे. तर पश्चिम रेल्वेकडून बाप्पाला निरोप दिल्यानंतर गणेश भक्तांची गैरसोय होऊ नये, याकरीता चर्चगेट ते विरार मार्गावर आठ जादा लोकल गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
गणपती बाप्पाचा दर्शनासाठी रात्री बाहेर पडणाऱ्या प्रवाशांसाठी मध्य रेल्वेकडून १८ ते २२ सप्टेंबर या पाच दिवसांसाठी सीएसएमटीहून मध्यरात्री १.३० वाजता सुटेल आणि कल्याणला ३ वाजता पोहचणार आहे.
तर पश्चिम रेल्वेने २३ सप्टेंबर रोजी मध्यरात्री आठ विशेष फेऱ्या चालवण्याची घोषणा केली आहे. ही लोकल सर्वच स्थानकांवर थांबवण्यात येणार आहे. चर्चगेटहून रात्री १.१५ वाजता सुटणारी लोकल विरार येथे रात्री २.५० वाजता पोहोचेल.
दुसरी लोकल चर्चगेटहून रा. १.५५ हून निघून रा. ३.२२ वाजता पोहोचेल. तिसरी लोकल रा. २.२५ वाजता सुटून विरारला ४.०२ वा. पोहोचेल. चौथी लोकल चर्चगेटहून रा. ३.२० वाजता सुटून पहाटे ४.५८ वाजता पोहोचेल.
परतीच्या मार्गावर विरारहून रा. १२.१५ वाजता सुटणारी लोकल चर्चगेट येथे १.५२ वाजता पोहोचेल दुसरी लोकल १२.४५ वाजता निघून रा. २.२२ चर्चगेटला पोहोचेल.
तिसरी लोकल विरारहून रा. १.४० वाजता सुटून चर्चगेट येथे रा. ३.१५ येथे पोहोचेल. चौथी लोकल विरारहून निघून चर्चगेट येथे पहाटे ४.४० वा. पोहोचणार आहे.