मुंबई : महाराष्ट्राची सध्याची राजकीय स्थिती फारच रंजक स्थितीत आली आहे. शिवसेनेसाठी ही फारच दिलासादायक बाब म्हणता येईल. यावरून शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल, आणि शिवसैनिक आनंदाने म्हणतील, 'बघताय काय रागानं, सरकार स्थापन केलंय वाघानं'. यासाठी दोन मुद्दे अतिशय महत्वाचे आहेत, काँग्रेसने जरी म्हटलं असलं, 4 वाजता महाराष्ट्रातील महत्वाच्या नेत्यांशी दिल्लीत बैठक आहे, आणि त्यानंतर निर्णय घेऊ की, सरकार स्थापन केलं जाणार आहे किंवा नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पण सुत्रांच्या माहितीनुसार काँग्रेस पर्यायी सरकार, म्हणजे शिवसेनेला जरी पाठिंबा देणार असले, तरी तो पाठिंबा बाहेरून द्यायचा किंवा सत्तेत सहभागी व्हायचं यावर शेवटचा निर्णय सायंकाळी 4 च्या बैठकीत होणार आहे.


भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेस शिवसेनेला बाहेरून का असेना, निर्णय घेण्यासाठी सकारात्मक असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.


तर दुसरीकडे राष्ट्रवादीने पर्यायी सरकारला पाठिंबा देण्याची आम्ही भूमिका घेतली आहे. पण अजूनही काँग्रेसच्या भूमिकेची आम्ही वाट पाहत आहोत. महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांची दिल्लीत जी 4 वाजता बैठक होणार आहे, त्यात शेवटचा निर्णय येणार आहे.